भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेघेंविण जळ कीं जळेंविण पूर । नख न बुडे परी नाहीं उतार

meghenvin jal kin jalenvin pur | nakh na bude pari nahin utar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मेघेंविण जळ कीं जळेंविण पूर । नख न बुडे परी नाहीं उतार ॥१॥ येथें आहे तो बुडे नाहीं तरे । लटिक्याचे खरें मानिसी काई ॥२॥ म्हणे खेचर विसा तूं जालासी पिसा । दृश्याची हे आशा सांडी नाम्या ॥३॥