भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेघ अमृताचा जेथूनि पवाड

megh amrutacha jethuni pavad

मेघ अमृताचा जेथूनि पवाड । दुजियाची चाड नाहीं तेथें ॥ १ ॥ तें रूप अरूप सुंदर सावळे । भोगिती गोवळे सुखसिंधु ॥ २ ॥ विराट नाटकु वैराज जुनाटु । गोपवेषें नटु नंदाघरीं ॥ ३ ॥ निवृत्ति सत्वर सेवि सुखसार । प्रकृति आकार लोपें ब्रह्मीं ॥ ४ ॥