भजनी मालिका
← भजनांकडे परत

मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थडया

mayuradi pakshi nrutya karitati | nadya vahatati dohin thadaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थडया ॥१॥ भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सक-ळांच्या ॥२॥ विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्त-स्वरें ॥३॥ मंदमंद मेघ गर्जंना करीती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥ नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदानें ॥५॥