भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेसी रुसलें भावासी त्यागिलें । जाऊनि राहिलें काकापासीं

mayesi rusalen bhavasi tyagilen | jauni rahilen kakapasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायेसी रुसलें भावासी त्यागिलें । जाऊनि राहिलें काकापासीं ॥१॥ काकी मुख दावा काकी मुख दावा । काकी मुख दावा बाईयांनो ॥२॥ काकीचें श्रीमुख गोरक्षा लाधलें । काकीनें पुसिलें गोरक्षासी ॥३॥ नामा ह्मणे आह्मां काकी पैं वोळली । सत्रावी दिधली दोहावया ॥४॥