भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापें काय नसती आमुचीं । लेंकरें आमचीं त्याचे हातीं

mayabapen kay nasati amuchin | lenkaren amachin tyache hatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मायबापें काय नसती आमुचीं । लेंकरें आमचीं त्याचे हातीं ॥१॥ माझें देईं माझ्या हातीं लवलाही । होईं उतराई केशीराजा ॥२॥ तुझ्या पायीं माझा बांधीन गळा । न भियें कळिकाळा सत्य जाणा ॥३॥ जितुकें देणें तितुकें घेईन मी आतां । नामयानें जातां सांगितलें ॥४॥ रगठया पाठोळ्यासी पडियेली मिठी । आतां जगजेठी तुज मज ॥५॥ बोरी काटे कांहो केळी आहो फाटे । नामयाचे विठे खवळलें ॥६॥