भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबापें आमचीं विठोबा रखुमाई निजाची

mayabapen amachin vithoba rakhumai nijachi

मायबापें आमचीं विठोबा रखुमाई निजाची । त्याचीये गांवींची कोण्ही येतु न्यावया ॥१॥ माझा विसावा माहेर पंढरपूर वो । ऐशी वाट पाहातसे जरु ॥२॥ ये सासुरा आमुची बहु बाहरु । काम क्रोध मद मत्सरु । मज आटिती दीरु ॥३॥ अहंकार खेदिताहे भावा । दंभ प्रपंच या जावा । येरुन येरा घालिती हेवा । आपुल्या सवा ओढीतसे ॥४॥ आवो चिंतेवोही निके वोढाळे । तुज मज ठायींचे वेगळें । वोढूनि नेसी आपुल्या बळें । तुझ्या सळें नांदतसे ॥५॥ आशा लागलीसे सर्पिणी । ग्रासूं पाहातसे पापिणी । रामनामाचिया ध्वनी । आइकों नेदीये श्रवणीं ॥६॥ माझें सत्त्वबळारथीं । धीरु धर्म हा सांगाती । संती सांगितलें निवृत्ती । तरी मी जीवें वांचलिये ॥७॥ ऐसी दगदगल्यें सासुरवासा । विठोबारखुमाई माझा कुवासा । निवृत्ति दासु तयाचा । जन्मोजन्मीं वोळगणा ॥८॥