भजनी मालिका
← भजनांकडे परत

मत्स्य कच्च क्रोड मृग ते खुजट । जेथूनि प्रगट झालीं रूपें

matsya kachcha krod mrug te khujat | jethuni pragat jhalin rupen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मत्स्य कच्च क्रोड मृग ते खुजट । जेथूनि प्रगट झालीं रूपें ॥१॥ तेंचि ब्रह्म उभें भिंवरेच्या तिरीं । हात कटावरी ठेवू-नियां ॥२॥ मातृघाती हिंडे वनीं जो रडत । चोर जात घात करी दुष्ट ॥३॥ दिगंबर अश्वारूढ खड्गधारी । पृथ्वीचा जो करी ग्रास एक ॥४॥ नामा म्हणे मुंगी आदि ब्रह्मवरीं । नाना अवतारीं एकलचि ॥५॥