भजनी मालिका
← भजनांकडे परत

माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग

mati tudavitan nahin dehasthiti | athavit chittin pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग ॥१॥ गोरोबाची कांता पाणियासी जातां । पुत्राला पाहतां खेळतसे ॥२॥ द्दष्टी असों द्यावी स्वामि बाळावरी । नाहीं कोणी घरीं सांभाळाया ॥३॥ नामा म्हणे नाहीं गोरा देहावर । सर्वही निर्धार पांडूरंगीं ॥४॥