भजनी मालिका
← भजनांकडे परत

माथें टेंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥ध्रु

mathen tenkit bahya pasarit | dangache adhar gheti ||dhru

माथें टेंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥ध्रु०॥ एक म्हणती आम्हीं उचलिला पर्वत । बहुत मिळोनि काय नव्हतीरे ॥१॥ बाहे कडाडित मनगटें लचकत । म्हणोनि उठिले अवघेरे ॥२॥ तयामाजिं असतां न दिसे बाप ॥ समर्थ थोर तुझी मावरे ॥३॥ काळु आतुडे परि वेळु नातुडे । म्हणौनि रक्षिलें सकळारे ॥४॥ बाप रखुमादेविवर विठ्ठल साचा । म्हणोनि रक्षिलें आम्हारे ॥५॥