भजनी मालिका
← भजनांकडे परत

मथनीं मथन मधुरता आपण

mathanin mathan madhurata apan

मथनीं मथन मधुरता आपण । विश्वीं विश्व पूर्ण सदोदित ॥१॥ तें हे चतुर्भुज मुगुटवर्धन । सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥ दुमदुम पाणि दुमिळित ध्यानीं । दृढता निशाणीं काष्ठीं लागे ॥३॥ ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हें अचळ । शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥ क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा । आपरूपें भिन्न होऊं नेदी ॥५॥ निवृत्ति कठिण गयनिप्रसाद । सर्वत्र गोविंद नंदाघरीं ॥६॥