भजनी मालिका
← भजनांकडे परत

माथां पडतां पालां । सांब तेणें संतोषला

mathan padatan palan | samb tenen santoshala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माथां पडतां पालां । सांब तेणें संतोषला ॥१॥ होता प्राचिनाचा ठेवा । बहु दुर्लभ मानवा ॥२॥ काय भक्तीचा जीव्हा-ळा । काय त्याचे अंगीं कळा ॥३॥ बहु केलीं दुष्ट कर्म । सेखीं तोचि झाला धर्म ॥४॥ नामा ह्मणे भोळादेव । सांगायाचा हाचि भाव ॥५॥