भजनी मालिका
← भजनांकडे परत

माथां मोरपिसा वेठी । श्रवणीं कुंडलें पदक कंठीं

mathan morapisa vethi | shravanin kundalen padak kanthin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माथां मोरपिसा वेठी । श्रवणीं कुंडलें पदक कंठीं । हातीं घेऊनी वेताटी । गोधना पाठीं लागले ॥१॥ तुझीं पाउलें अनंता । न विसंबे गा सर्वथा । गोविंदा माधवा अच्युता । श्री विठ्ठला ॥२॥ गाई गोवळी पावला । येक म्हणती वळावळा । विष्णुदास नामा चरणाजवळा । अखंड वळत्या देतसे ॥३॥