भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेचें बाळक पित्याचें जनक

matechen balak pityachen janak

मातेचें बाळक पित्याचें जनक । गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥ मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥ पूर्वज परंपरा तें धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥ निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त । आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥