भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ

mata pita bandhu bhagini ishtamitra viththal tun re ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माता पिता बंधु भगिनी इष्टमित्र विठ्ठल तूं रे ॥धृ०॥ बापा यावें भेटावें विसांवा माझा गा तूं । माझा कुळाचार माहेर रे जिव्हार विठ्ठल तूं ॥१॥ माझें विद्याधन आयुष्य आरोग्यता विठ्ठल तूं गा । माझें तप व्रत तीर्थ दान पुण्य विठोबा तूं गा ॥२॥ माझा गुरुमंत्र दैवत आगम निगम विठ्ठल तूं गा । भूपति सुरपति ब्रह्म-मूर्ति विठोबा तूं गा ॥३॥ माचा आचार विचार सत्यवाद धीर धर्म विठोबा तूं गा । यश कीर्ति निवृत्ति आतां माझी तृप्ति विठोबा तूं गा ॥४॥ माझे यम नियम प्राणायाम प्रत्याहार विठोबा तूं गा । नामा ह्मणे विठोबा केशव परमात्मा माझा तूं गा ॥५॥