भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता म्हणे नामा राऊळाशीं खेळतां । तुज कोण्या दैवता ओढियलें

mata mhane nama raulashin khelatan | tuj konya daivata odhiyalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माता म्हणे नामा राऊळाशीं खेळतां । तुज कोण्या दैवता ओढियलें ॥१॥ लाजिरवाणें नाम्या तुवां केलें जिणें । हांसती पिशुनें देशोदेशीं ॥२॥ सांडि देवपिसें नको करुं ऐसें । बळें घर कैसें बुडविसी ॥३॥ जन्मा येऊनियां पराक्रम करीं । काम होसी संसारीं भूमिभारा ॥४॥ सुदैवाची लेंकरें वर्तताति कैसीं । तूं मज जालसि कुळक्षय ॥५॥ कैसी तुज नाहीं कौकिकाची लाज । हेंचि थोर मज नवल वाटे ॥६॥ अभिमान अहंता सांडुनियां जगीं । नाचतोसि रंगीं गीत गातां ॥७॥ तुजविण लोक अज्ञान नसती । क्षण न विसंबती मायबापाअ ॥८॥ पुत्र आणि कलत्र घराची विपत्ति । तुज अभाग्याचे चित्तीं पंढरीनाथ ॥९॥ यातें भजतीं त्याचें न उरेचि कांहीं । हाचि देव पाहीं घरघेणा ॥१०॥ जयाचें खुंटे तो लागे याच्या पंथें । तुजसि शिकवितें म्हणोनियां ॥११॥ गोणाई म्हणे नाम्या हें नव्हे पैं भलें । विठोबाणें केलें आपणा ऐसें ॥१२॥