भजनी मालिका
← भजनांकडे परत

माराया कृष्णासी । कंसें पाठविला केशी

maraya krushnasi | kansen pathavila keshi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माराया कृष्णासी । कंसें पाठविला केशी ॥१॥ बहु असे तो प्रतापी । आला अश्वाचिये रूपीं ॥२॥ देवा डसाया धांवला । धरूनि पायीं झुगारिला ॥३॥ मुखीं देऊनियां हात । श्वास कोंडी जगन्नाथ ॥४॥ नामा ह्मणे पडलें प्रेत । हर्ष सुरवरां बहुत ॥५॥