भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंत्राचा पैं मंत्र हरी हरी उच्चार । न लागे तो विचार करणें कांहीं

mantracha pain mantra hari hari uchchar | na lage to vichar karanen kanhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंत्राचा पैं मंत्र हरी हरी उच्चार । न लागे तो विचार करणें कांहीं ॥१॥ सुफळ नाम गाढें वाचेसि उच्चारुं । केशव हाचि करुं सर्वांभूतीं ॥२॥ नाहीं यासी पतन न होईल बंधन । नित्य हेंचि स्नान रामनामें ॥३॥ नामा म्हणे भाव सर्वांभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥४॥