भजनी मालिका
← भजनांकडे परत

मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती

mandivari ghet yashoda sundari | alavi shrihari nana yukti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मांडीवरी घेत यशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥१॥ तूंची माझ प्राण तूं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥२॥ गणगोत भाऊ तूंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥३॥ तूंचि माझा धनी तूंची माझें जीवन । चुंबीत वदन वेळोवेळां ॥४॥ नामा म्हणे भार घाली मांदीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥५॥