भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी

manachi srushti svapna vartavi drushti

मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी । अळंकारलें उठी गंधर्वनगर । तेथेंचिये राणिवेसाठीं कां भ्रमु धरितासि पोटीं । जेथें जेथें पाहातां पाहणें नुठी तोचि होई । म्हणोनि देखणीया जवळीके कीं दृष्टिविण सुके तैसें स्वानुभवें स्वानुभव मावळे ज्याच्या ठायीं । ते अवस्थेविण दृष्टि गोचर होई वेगीं तें देखणेंचि दृष्टि विठ्ठल रया ॥१॥ तुझें तूंचि विंदान जाणोनि पाहीं । आपेंआपवीण विचारु नाहीं ॥२॥ म्हणौनि एकमेका मज आठवे आठवेचि विसरोनि फ़ावे । पैं देहद्वयभाव विरोनि जाय तेथें पदत्रयाची मांडणी कीं तत्त्वत्रयाची वाणि या पांचांते जेथ न फ़ावे । कर्मेद्रिया ज्ञानेंसी ज्ञानेंद्रियें जो नेमेसी तंव ते विस्मो करुनि पाहे सुखस्वानुभवादु:ख प्रकाशले ते सुख केवि फ़ावे । याचिया गुणागुण न गुंजिजे ह्र्दयीं सुखावोनि तेंचि तूं राहे रया ॥३॥ मग आंग शेजबाज कीं हे बाह्येंद्रियांचे उपभोग मानिसीं साच । जरी सोंग स्वप्नींचें असे ऐसें जाणतां निदसुरा होसी दातारा या स्वप्नींच्या वोरबारा बापा वोथरसि कांपा । म्हणोनि बापरखुमादेविवरुविठ्ठलु उघडे डोळांचि निधान देखिजे तवं मार्ग सोपा । म्हणोनि तेथींच्या तेथें पाहतां याविण नाहीं दुजें । वाया खटपट करिसी बापा रया ॥४॥