भजनी मालिका
← भजनांकडे परत

मना लागो हाचि धंदा रामकृष्ण हरि गोविंदा

mana lago hachi dhanda ramakrushna hari govinda

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
मना लागो हाचि धंदा रामकृष्ण हरि गोविंदा ।। १ ।। जिव्हे करूं नित्य नेम सदा विठोबाचें नाम ||२॥ नामामध्यें नामसार। जप करी निरंतर ||३|| म्हणे जनी नाम घेणें नाममंत्र शंकर होणें ||४||