भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन सुमन घालूनि माळा

man suman ghaluni mala

मन सुमन घालूनि माळा । करुनि सकळा कळा गळां पुर्ण वो माये ॥१॥ आउट पिठींची दुरुगिळी घातली । तेथें दोघें पुजे बैसविले पुजे वो माये ॥२॥ तेथें अद्वैत अंगारु परोपरी वासु । करुनियां सायासु वैराग्य ज्ञाने वो माये ॥३॥ ऐसा ह्रदयमंदिरीं दुर्गादेवीअंतरीं । रखुमादेविवरु निर्धारी वो माये ॥४॥