भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन माझें चोरटें लागलें कुसंगीं । बांधिलें षड्‌वर्गीं धरोनि त्यातें

man majhen choraten lagalen kusangin | bandhilen shad‌vargin dharoni tyaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मन माझें चोरटें लागलें कुसंगीं । बांधिलें षड्‌वर्गीं धरोनि त्यातें । केउता गेलासि माझ्या कृपावंता । ये गा पंढरिनाथा मायबापा ॥१॥ वासनेची बेडी घालोनि माझे पायीं । विषयवज्रघायीं त्रासिताती । आशा तृष्णा माया आणिक कल्पना । करिताति कामना नानाविध ॥२॥ कामक्रोध दंभ लाविताती कळा । ये माझ्या गोपाळा सोडवणें । नामा म्हणे माझें घेउनियां चित्त । करि बंधन मुक्त संसाराचें ॥३॥