भजनी मालिका
← भजनांकडे परत

माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें

mala mudra song gheun hoti sant | sada vishayant chitta tyanchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माळा मुद्रा सोंग घेऊन होती संत । सदा विषयांत चित्त त्यांचें ॥१॥ पोटासाठी एक घेऊनियां वेष । ठकविती देश रांडापोरें ॥२॥ पाषाण बांधोनि नदीये निघाला । सांगा कोण गेला पैलतीरा ॥३॥ ब्राम्हणाचे परी मैंद वेष धरी । घालावया करीं फांसे जैसे ॥४॥ विहा म्हणे संतन म्हणता त्यासीं । जाती नरकासी अध:पाता ॥५॥