भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या

majhya thevi dakhavin lavalahi | bandhin mi payin jiv tujhya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझ्या ठेवी दाखवीं लवलाही । बांधीन मी पायीं जीव तुझ्या ॥१॥ सिद्धच ठेवणें नामयानें ठेविलें । त्यासी कां लाविलें आडवें हें ॥२॥ दोही कटावरी ठेऊनियां हात । कैसा हा पाहात घर घेणें ॥३॥ तुझिया पायासीं बांधीन मी गळा । व नीय़ें कळिकाळा सत्य जाण ॥४॥ दारकोंड करोनि बैसेन दारवंटा । नामयाचा विठा हालों नेदी ॥५॥