भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों

majhya kanhachen tumhin nav bhari ghyavon

माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों । ह्रदयीं धरोनि तुम्ही खेळावया न्यावो ॥१॥ भक्तांकारणें येणें घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥ कल्पनेविरहित भलतया मागें । अभिमान सांडूनी दीनापाठीं लागे ॥३॥ शोखिली पुतना येणें तनू मोहियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥