भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण

majhiye manin vishranti vate | dekhatan gomate vite charan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥ कुंडलांचे दीप्ती झळाळ । शोभलें निढळ बुक्यानें ॥३॥ निळा म्हणे अंगींचे कांति । सूर्यादि लोपती शशिमंडळें ॥४॥