भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये ह्रदयीं बुंथी ते डोळ्यां

majhiye hradayin bunthi te dolyan

माझिये ह्रदयीं बुंथी ते डोळ्यां सगुणप्रीति वाचे नाम संपत्ति ऐसेंचि असो । म्हणौनि तुझें नाम आवडे हेंचि प्रेम न विसंबे वर्म निजध्यास रया ॥१॥ श्रवण नाम गोडी श्रवण नाम गोडी । हीच आवडी देई मना ॥२॥ तुझिये सगुण बुंथीचा वासु व्हावा माझ्या ह्रदयीं ऐसा निज सुखाचिया निजध्यासा । तुझिये आवडी अनुसंधान तुझिया स्वरुपीं मन डोळा बैसो कां ध्यान हेंचि रुप । हेंचि निज आवडी देईकां दातारा चुकवी येरझारा गर्भवास ॥३॥ म्हणौनि रखुमादेविवरा विठ्ठला उदारा भावें जोडलासि आम्हा । श्रुतिपुराणे वर्णिती नेति नेंति तुझा महिमा । तुझें नाम रुप सुंदर हेंचि निरंतर देई आम्हा सर्वोत्तमा रया ॥४॥