भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें

majhen svarup myanchi shrrungarilen

माझें स्वरुप म्यांचि श्रृंगारिलें । निर्वाणी म्या केलें लयाकार ॥१॥ आपुली सोसे वाढवावया गेलें । तव आपणाचि ठेलें आपण्याठायीं ॥२॥ सहजगुणाचे निर्गुण वो केलें । माझें म्या पाहिलें मन मावळुनिगे माये ॥३॥ तीन चारी मिळोनि येके ठायीं घातलीं । बापरखुमादेविवरा विठ्ठलीं फ़ावलीं ॥४॥