भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं

majhen majhe hatin hit | didhalen santamunishvarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥ काय उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥ जिहीं पाजीलें अमृत धणीं । तयां कांजवणी काय देऊं ॥३॥ निळा म्हणे रत्पपालटा । सागरगोटा काय तुके ॥४॥