भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा

majhen duhkh nashi deva | maj sukh de keshava

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझें दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥ आह्मां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥ चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥ जनी म्हणे हेंचि मागें । धण्या सर्व तुज सांगें ॥४॥