भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ

majhen achaden bachaden chhakuden ga radhe rupaden | pangharun ghali tin kunchaden ||dhru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥ हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा । यानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥ हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता । जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥ ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी । बळिभद्र त्याचा गडी ॥३॥ जनी म्हणे तूं चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनीं । लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥