भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मनींज ऐसें होतें आतां देवा । भाव समर्पावा तुझे चरणीं

majhe maninj aisen hoten atan deva | bhav samarpava tujhe charanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे मनींज ऐसें होतें आतां देवा । भाव समर्पावा तुझे चरणीं ॥१॥ तंव मायामोहें मजसी केला हेवा । लोटियेलें भवजळामाजीं ॥२॥ आशानदी पुरीं वाहविलीं वेगीं । काढी मज हरी कृपाळुवा ॥३॥ सरितेमाजीं धारिलों या मदनमगरें । पुढारें माघारें जाऊं नेदी ॥४॥ थडिये उभाउभीं धांवगा श्रीहरी । मजा हानी थोरी सर्वस्वें गेलों ॥५॥ भक्ति नवरत्नांची बुडाली वाखोरी । काढी वेगीं हरी मायबापा ॥६॥ धीर आणि विचार ह्या दोन्ही सांगडी । श्रद्धा दोरी पुढील तुटोनि गेली ॥७॥ भावबळें सांपडलों दाटलों उभडीं । वेगीं घाली उडी कृपाळुवा ॥८॥ तुझे भक्तिविण कोरडा होय गळा । नेतो रसातळा क्रोध मीन ॥९॥ नामा म्हणे तुझा मी सकळ जीवा । तरी हा काढावा शरणांगत ॥१०॥