भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी

majhe jivinchi avadi | pandharapura nein gudhi

माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥