भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा केला अंगीकार। काय जाणे मी पामर

majha kela angikar| kay jane mi pamar

रचनाकार: संत सेना · अभंग
माझा केला अंगीकार। काय जाणे मी पामर ॥१॥ देव दीनाचा दयाळ। शरणागता पाळी लळा ॥२॥ प्रल्हाद कारण । प्रगटला नारायण ॥३॥ मीराबाईसाठीं। केवढी केली आटाआटी॥४॥ शरण रिघा पंढरीराया। सेना न्हावी लागे पाया ॥५॥