भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई

majha ha vithoba yeil ge kevhan jevin mi tevhan gonabai

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई ।। १॥ जाउनी राउळा तयासी तूं पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥ भरलिया रागें क्रोध त्याचा साहे लवकरी बाहे भोजनासी ॥३॥ ज्ञानेश्वरा घरीं असेल बैसला। जाउनी विठ्ठला पाहें तेथें ॥४॥ जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा। खोळंबला नामा भोजनासी ॥५॥