भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज स्वप्नी लेवविला श्रृंगारु

maj svapni levavila shrrungaru

मज स्वप्नी लेवविला श्रृंगारु । माझें उदरीं जन्मला भ्रतारु ॥१॥ जागि सुति ना मी निदसुरी । चोळी सुदली तोडूनि गळसरी ॥२॥ लक्षण म्हणे कीं सुलक्षण म्हणे । येके उदरींच आम्हीं दोघें जणें ॥३॥ सोईरिक पडिपाडें समसाटीं । मी वो बैसलें तयाचे पाठी ॥४॥ निकट कैसें आहेवपण । कैवल्या आधीं तेल कांकण ॥५॥ निवृत्ति दास तेथें नाहीं । लग्नमुहूर्त बहुलाठाई ॥६॥