भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज गांजिल्याचा धांवा । सावधान परिसावा

maj ganjilyacha dhanva | savadhan parisava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मज गांजिल्याचा धांवा । सावधान परिसावा ॥१॥ विठो सुजाणाच्या राया । धांव माझया करुणालया ॥२॥ माझें मन हें पामर । भ्रांत हिंडे दारोदार ॥३॥ मोहोपाशीं मज बांधिलें । भेणें वैराग्य साधिलें ॥४॥ नामा म्हणे काय करूं । तुजविन भूमिभारू ॥५॥