भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग सकळ प्रेम पुतळे । बैसले माजीं ब्रह्ममेळे

mag sakal prem putale | baisale majin brahmamele

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग सकळ प्रेम पुतळे । बैसले माजीं ब्रह्ममेळे । तेथें नामा वचन बोले । स्वामीप्रति ॥१॥ वोळलें चैतन्य सतरावें । पूर्ण वोघ नामा विठठलदेवें । पव्हे घालुनी ज्ञानदेवं । जग तारिलें कीर्तनें ॥२॥ नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ । परि आमुचें मन निमग्न । चरणरजें पापभग्न । पवित्र जालों ॥३॥ तरी स्वामिराजा विनंति । परियेसी गा माझी पुढती । हे आळंकापुरीं होती । कवणियें युगीं ॥४॥ हें सांगिजे जी समर्था । कवण क्षेत्र कवण तीर्था । येथें क्षेत्रज्ञ हा सर्वथा । कवण धर्म असे ॥५॥ तूं आत्माराम संपन्न । जुगा जुनाट नारायण । तुनप्रति हें वचन । न साहे माझें ॥६॥ कासवीचा तुषार गाढा । तैसा तुझा पवाडा । हें पुसणें कवणियां चाडा । तें तूंचि जाणसि ॥७॥ नामा उभा तिष्ठत प्रेमें । संत दाटले सप्रेमें । आपण तें तें अनुक्रमें । सांगतसे देव ॥८॥