भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग केशव म्हणे माझें परिसा वचन । गुज मी सांगेन अंतरीचे

mag keshav mhane majhen parisa vachan | guj mi sangen antariche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग केशव म्हणे माझें परिसा वचन । गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥ व्रत तप दान सकळ कर्मक्रिया । एक भूतदया असे जेथें ॥२॥ तोचि सत्य मानी भक्त आणि ज्ञानी । न विसंबे निर्वाणीं जीवें त्यासी ॥३॥ ज्ञानाचेम सौभाग्य भक्ति आणि वैराग्य । तयाचेम आरोग्य प्रेमरस ॥४॥ त्यासी संजीवनु सदा संत संगू । त्यावरी अनुरागू वज्रकवच ॥५॥ धर्मअर्थकममोक्षे दृष्टि नाणी । वोळगती आंगणीं मुक्ति चारी ॥६॥ अनुहात गजरु होतसे नामाचा । दीप अलक्षाचा पाजळितु ॥७॥ इंद्रपदादिकें नाशिवंत होती । म्हणोनि आसक्ती न धरावी त्यांची ॥८॥ हे जाणोनि साच न धरावी त्यांची आस । अखंड माझा वास ह्रदयीं त्यांच्या ॥९॥ कामक्रोध वैरी दुराविले दुरी । मज ह्रदयमंदिरीं सांठविलें ॥१०॥ तेणें त्याच्या उच्छिष्टा जालोंसे अधिकारी । ब्रह्मारस सरी न पवी जेथें ॥११॥ म्हणोनि ये संसारी धन्य एक नामा । जेणें माझा प्रेमा अनुभविला ॥१२॥