भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंकुम केशराचे समाधीसी सडे । पहाती निवाडे जनलोक

kunkum kesharache samadhisi sade | pahati nivade janalok

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुंकुम केशराचे समाधीसी सडे । पहाती निवाडे जनलोक ॥१॥ गोदातीरीं महोत्सव चांगदेवा । पूर्ण तुं विसावा पांडुरंगा ॥२॥ समाधीभोंवते उभे साधुसंत । उतरले आंत चांगदेव ॥३॥ निवृत्ति पांडुरंग गेले समागमें । वैष्णव रामराम बोलताती ॥४॥ राहि रखुमाबाई उभ्या दोहीं बाहीं । मध्यें मुक्ताबाई संबोखिती ॥५॥ नामा पुंडलिक करिती समाधान । स्थिर करा मन बोधभावें ॥६॥