भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता

kulaguru vasishtha sange nrupavara | asati garodara tujhya kanta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥ धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥ ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकई सदनासी जाता झाला ॥३॥ मंचकीं बैसली होती ते पापिणी । देखतां नाययीं पहूडली ॥४॥ सुंदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरि गर्मिणी नामा ह्मणे ॥५॥