भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षीर सागरीचें निजरुपडें । पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे

kshir sagarichen nijarupaden | pahatan parakhiya tribhuvanin na sampade

क्षीर सागरीचें निजरुपडें । पाहतां पारखिया त्रिभुवनीं न संपडे । तें उभें आहे वाडें कोडें । पुंडलिकाचे आवडी ॥१॥ मेघश्याम घेउनियां बुंथी । जयातें श्रुती पैं वानिती । कीं तें पुराणांसी वाडे । तें पंढरिये उभें असें कानडे गे माये ॥२॥ आवडीच्या वालभें गोजवलें गोजिरें । पाहातां साजिरें त्रिभुवनाएक गे माये ॥३॥ तें सकळ मंगळदायकाचें प्रेम आथिलें । कीं ब्रह्मरसाचें वोतिलें घोसुलें । ब्रह्मविद्येचें सार मथिलें । देखा सकळ आगमींचें संचलें । की बापरखुमादेविवर विठ्ठल नामें मढिलें । श्रीगुरु निवृत्तीनें दिधलें । प्रेमखुण रया ॥४॥