भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णातें चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक

krushnaten chaitanya gauliya gopala | jivincha ji-vhala krushna ek

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णातें चैतन्य गौळिया गोपाळा । जिवींचा जि-व्हाळा कृष्ण एक ॥१॥ न गमेचि तया कृष्ण संगाविणें । कृष्णीं चरणीं मन सर्वकाळ ॥२॥ कृष्ण सुख जिवीं कोंदलें सर्वांसी । उभे कृष्णपाशीं मागेंपुढें ॥३॥ नामा ह्मणे कृष्ण भक्ताचें जीवन । कृष्णीं समाधान भक्तालागीं ॥४॥