भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका

krushnabaliramaten mhanati | govale tumhin arbhak jati | marila mhanoni kulavai hastin | tenenchi sphundesphundun naka

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृष्णबळिरामातें म्हणती । गोवळे तुम्हीं अर्भक जाती । मारिला म्हणोनी कुळवई हस्तीं । तेणेंचि स्फुंदेस्फुंदूं नका ॥१॥ बहुत दिवस खादलें लोंणी । चोरिये वोसिली दुधाणी । सिंतरुनियां भोगिल्या गौळणी । त्याचीही झाडती निघेल । ॥२॥ न विचारित पतंग जैसा । झडपूं धांवें दीपप्रकाशा । तैसे तुम्ही नेणंता कंसा । राया सन्निध पावलेती ॥३॥ पिपालिके फुटतां पक्ष । म्हणे गगन लंघीन मी अंतरिक्ष । परी मृत्यु पातला हें प्रत्यक्ष । न लक्षेचि परी ते झाली तुम्हां ॥४॥ रज क मर्दूनियां बलौता । निदसुरियां धनुर्धरा समस्तां । यश मानियेलें परि तें आतां । येचि क्षणीं जाणवेल ॥५॥ पूतना बाई माभळ भट । एक ते स्त्री एक ते भट । कागबगादिदैत्य आदट । नेणती मल्लसंग्राम ॥६॥ निळा म्हणे ठाकिलें त्यांसी । तेचि पाहों येथ आलेसी । ऐसे बोलोनियां अति आवेशी । भुजा थापटोनी उठिले ॥७॥