भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण सहाय पांडवासी । ते भोगिती नष्टचर्यासी । ते भोगिती नष्टचर्यासी । साह्य केलें हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना

krushna sahay pandavasi | te bhogiti nashtacharyasi | te bhogiti nashtacharyasi | sahya kelen hariharasi | prarabdha konasi talena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्ण सहाय पांडवासी । ते भोगिती नष्टचर्यासी । ते भोगिती नष्टचर्यासी । साह्य केलें हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥१॥ ऐसी प्रार-ब्धाची ठेव । झाले भिक्षुक पांडव । राज्य घोडे भाग्य सर्व । सांडि-येला ठाव प्रारब्धें ॥२॥ शरीर संचिता आधीन । धर्मराज हिंडे वन । कर्में बुडाला रावण । आणि दुर्योधन प्रारब्धें ॥३॥ अभिमा-नें शिशुपाळ । कृष्ण हस्तें झाला काळ । यादव निमाले सकळ । केलें निर्मूळ प्रारब्धें ॥४॥ कर्मरेखा टळेना । बाण लागला जग-जीवना । कृष्णें सांडिल्या गोपांगना हें नारायणा प्रारब्ध ॥५॥ कामबुद्धीचें सुख । अति मानिती ते मूर्ख । चंद्रासी लागला कलंक । इंद्रासी दु:ख प्रारब्धें ॥६॥ हरिश्चंद तारामती । घोर जन्मांतर भो-गिती । नळराव पुरुषार्थीं । तयाच्या विपत्ति प्रारब्धें ॥७॥ पति-व्रता सुशीळ । दमयंती पायें पोळे । ऐसें अनिवार कपाळ । भोगी दुष्काळ प्रारब्धें ॥८॥ ऐसी अनिवार जन्मांतरें । राज्य सांडिलें रघुवीरें । सवें मेळवूनि वान्नरें । फिरवी दिगांतरें प्रारब्धें ॥९॥ फि-रत असतां काय झालें । पुढें प्रारब्ध ओढवलें । जानकीस राक्षसें नेलें । कष्ट भोगविले प्रारब्धें ॥१०॥ कर्मा आधीन शरीर । पूर्ण ब्रह्म रामचंद्र । रघुपति विष्णूचा अवतार । पाठीं जन्मांतर नामा ह्मणे ॥११॥