भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णा लविवसे स्तनीं । तिसी मारी चक्रपाणी

krushna lavivase stanin | tisi mari chakrapani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्णा लविवसे स्तनीं । तिसी मारी चक्रपाणी ॥१॥ भयाभीत पडे प्रेत । जन विस्मय करीत ॥२॥ रडे तेव्हां माया । वांचलासी बा तान्हया ॥३॥ मिळोनियां समस्त । भाळीं आंगारा लावीत ॥४॥ वसुदेवें सांगितलें । नंद ह्मणे तैसें झालें ॥५॥ कुर्‍हादी आणिती । गात्रें निकुरें तोडिती ॥६॥ नामा ह्मणे दिला अग्नी । वास न माये गगनीं ॥७॥