भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण गौळियाचे लोणी चोरी । तंव अवचिता शेंडी सांपडली हरी । घेवोनी आलिया बाहेरी । तंव यशोदे वोसंगा

krushna gauliyache loni chori | tanv avachita shendi sampadali hari | ghevoni aliya baheri | tanv yashode vosanga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृष्ण गौळियाचे लोणी चोरी । तंव अवचिता शेंडी सांपडली हरी । घेवोनी आलिया बाहेरी । तंव यशोदे वोसंगा ॥१॥ चाकाटलिया गौळणी । देवो विसरल्या गार्‍हाणीं । लाजें मौन्य धरोनी । अवलोकिती गोविंदा ॥२॥ आम्हां अवघियापासीं असे । पैल यशोदा वोसंगा दिसे । हें स्वप्न कीं साच असे । म्हणती मानसें वेडावलीं ॥३॥ ऐशा अनेक परिच्या वेदश्रुती । वाचे वर्णावया न येती । विठा विनवी विष्णुदासाप्रती । ऐसा यशोदेचा कान्हया ॥४॥