भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेच्या सागरेम भक्तकरुणाघनें । देऊन आलिंगनें निवविलें तयातें

krupechya sagarem bhaktakarunaghanen | deun alinganen nivavilen tayaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपेच्या सागरेम भक्तकरुणाघनें । देऊन आलिंगनें निवविलें तयातें ॥१॥ सर्गज्ञाचा रावो आत्मा ज्ञानदेवो । सांगेल अनुभवो तुम्हांप्रती ॥२॥ ते खूण अंतरीम धरा सर्वभावें । दृढ धरोनि जीवें जतन करा ॥३॥ न लगे तीर्थाटन काया क्लेष जाण । न लगे अनुष्ठान करणें बहू ॥४॥ न लगती सायास करणें उपवास । धरावा विश्वास संतसंगेम ॥५॥ न लगे वज्रासनीं बैसावें नेहटीं । न लगे गिरिकपाटीं करणें वास ॥६॥ न लगे उग्रतप नानामंत्र जप । भेणें जाय पाप संतसंगें ॥७॥ न लगे भस्म उधळनें वाहनें जटाभार । न घालावा पसार लोकाचारीम ॥८॥ सर्वभूतीं करुणा जिव्हे नामस्मृती । मन येईल निवृत्ति आपेंआप ॥९॥ क्रियाकर्मधर्म प्रेमेंविण खटपटा । करितां आला वीट दीर्घ दोषाचा ॥१०॥ साधनावांचुनी मार्ग सोपा जाण । करावें कीर्तन रामकृष्ण ॥११॥ सर्वकाळ कथा संतांची संगती । वाचे नाम कीर्ति सर्वकाळ ॥१२॥ तो हा राजमार्ग सर्वांहोनी चांग । सदा संतसंग वाचें नाम ॥१३॥ संकल्प विकल्प न धरावे मानसीं । मनोभावें संतांसीं शरण जावें ॥१४॥ ज्ञानदेव म्हणे पुढती ऐका एक । सांगेन प्रत्यक्ष अनुभव सिद्ध ॥१५॥