भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें

krupecha konvala raghunath das | dharin tyachi kas sarvabhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥ सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥ भवसिंधूचा पार उतरोनि निर्धारी । त्या-परती सोयरीं नाहीं सृष्टीं ॥३॥ अंतरींचें गुज सांगती श्रवणीं । अमृत संजीवनीं रामनाम ॥४॥ तेणें त्रिविधताप हरती मनींचे । जाणती जीवींचे झाले कष्टे ॥५॥ तो जीवलग जननी परिस लोभा-परु । सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥ नामा त्याचे बळें झेलतु यमासी । रिघोनि पाठींसी केशवाच्या ॥७॥