भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपावंत जाली जेव्हां मुक्ताबाई । स्वरूप दिशा दाही दाखविलें

krupavant jali jevhan muktabai | svarup disha dahi dakhavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपावंत जाली जेव्हां मुक्ताबाई । स्वरूप दिशा दाही दाखविलें ॥१॥ पाठीं पोटीं स्वरूप केलें सद्‌‍गुरुनें । तंव अभिमान गेला माझा ॥२॥ याच्या उपकाराची काय वर्णू थोरी । ज्यांच्यासंगें हरि जोडियेला ॥३॥ पुरे पुरे आतां आठविसी फार । होईल उशीर समाधीसी ॥४॥ नामा म्हणे देवा उठा संतजन । करूं आतां स्नान गौतमींसी ॥५॥